मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नगर परिषद मूलच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सौ. भारतीताई सुनील राखडे यांना अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
गरीबीची जाण असलेल्या आणि संघर्षमय जीवनातून उभं राहत समाजकार्यात सक्रिय असलेल्या भारतीयताई यांनी सातत्याने लोकसेवा करत महिला जिल्हाध्यक्ष या जबाबदारीच्या पदापर्यंत मजल मारली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून मदतीचा हात देणाऱ्या, लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.
शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिका-यांनी सांगितले की,
“मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि जनसंपर्क असलेल्या नेतृत्वाची गरज होती. त्यामुळेच भारतीताई राखडे यांना उमेदवारी दिली आहे.”
शहरातील नागरिकांमध्येही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, महिला नेतृत्वाला दिलेला हा मोठा सन्मान मानला जात आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















