मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील भीमवाडी वॉर्ड क्रमांक 14 येथील रहिवासी चरण नारायण गेडाम (वय अंदाजे 57 वर्षे) हे नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर गेले होते. मैदानावर फेरफटका मारून परत आल्यानंतर ते कर्मवीर महाविद्यालयासमोर रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच बंडू वाकडे आणि केशव दुर्गे यांनी तत्काळ मदतीस धाव घेत ऍम्ब्युलन्स बोलावून जखमी चरण गेडाम यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या ठिकाणी व्यायाम करणे टाळावे तसेच सकाळच्या वेळेतही वाहतुकीबाबत सतर्कता बाळगावी.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















