Homeताज्या बातम्यासावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ....

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते धावले मदतीला

ब्रेकिंग न्यूज
सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कारयंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रमनवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागतडिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदनभारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कारसावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते धावले मदतीलापहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत नागरिक गंभीर जखमीचंद्रपूर मध्ये कडक उन्हाचा फटका; पाण्यासाठी हरणे थेट महामार्गावरIPL सट्टेबाजांवर गडचांदुर पोलिसांची धडक कारवाई; एक जेरबंद, मोबाईल जप्तगुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भाजपचा अनोखा सत्कार उपक्रम

सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला असून, या घटनेत ३० महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तात्काळ गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली व तातडीच्या उपचारांचे निर्देश दिले.
*​नेमकी घटना काय?*
​डोनाळा येथील सुमारे ३० महिला एका टेम्पो वाहनाने सावली तालुक्यातील अंतरगाव येथे भोजन वाढण्याच्या कामासाठी निघाल्या होत्या. मात्र, डोनाळा टर्निंगवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील महिला गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.
भाजप नेत्यांची तत्परता
​या घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुका महामंत्री तथा सामाजिक नेते सचिनभाऊ तंगडपल्लीवार व युवा नेते जितू सोनटक्के यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
डॉ. अशोक नेते यांची रुग्णालयाला भेट
​माहिती मिळताच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी सर्व कार्यक्रम बाजूला सारून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी:
​जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छायाताई उईके यांच्याशी चर्चा करून उपचारांचा आढावा घेतला.
​प्रत्येक वार्डात जाऊन जखमी महिलांची वैयक्तिक विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
​”कुठल्याही प्रकारची उणीव भासू देऊ नका आणि जखमींना तातडीने दर्जेदार उपचार द्या,” अशा कडक सूचना उपस्थित डॉक्टरांना दिल्या.

​यावेळी सामाजिक नेते मनोहरजी कुकडे, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार साहेब,भाऊराव कोठारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भीषण अपघातामुळे सावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता आणि प्रशासनाने वेळेत दिलेला प्रतिसाद यामुळे जखमी महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे. सध्या सर्व महिलांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!