चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
शहरातील विधी महाविद्यालयासमोरील परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी घडली. मृत युवकाचे नाव नितेश वासुदेव ठाकरे (वय २७, रा. वार्ड क्र. १, बेताल चौक, दुर्गापूर) असे असून, तो रक्तबंबाळ अवस्थेत मृत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा) आणि रामनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांची चौकशी आणि परिसरातील तपासातून अवघ्या एका तासाच्या आत सहाही आरोपींना अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले.
प्राथमिक तपासानुसार, किरकोळ वादातूनच हा खून घडल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
१️. करण गोपाल मेश्राम (वय २२), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर
२️. यश छोटेलाल राऊत (वय १९), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर
३️. अनिल रामेश्वर बोंडे (वय २२), रा. समता नगर, दुर्गापूर
४️. प्रतिक माणिक मेश्राम (वय २२), रा. वार्ड क्र. ४, दुर्गापूर
५️. तौसिक अजीज शेख (वय २३), रा. फातेमा मस्जिद जवळ, वार्ड क्र. ३, दुर्गापूर
६️. सुजीत जयकुमार गणविर (वय २५), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर
यापैकी पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, तर एका आरोपीस रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थागुशा) व पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख (रामनगर) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात सपोनि देवराव नरोटे, दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा सुभाष गोहोकार, इम्रान खान, नितीन साळवे, रजनीकांत पुठठावार, दीपक डोंगरे, अजय बागेसर, चापोहवा प्रमोद डंबारे, पोअं हिरालाल गुप्ता, शंशाक बदामवार आणि शेखर माधनकर यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















