Homeक्राईमऐन दिवाळीत मोठा घातपात टळला! चंद्रपुर पोलिसांची धडक कारवाई – ४ आरोपी...

ऐन दिवाळीत मोठा घातपात टळला! चंद्रपुर पोलिसांची धडक कारवाई – ४ आरोपी अटकेत, १७ लाखांचा शस्त्रसाठा जप्त

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात शहरात मोठा घातपात घडविण्याचा कट रचला जात असतानाच चंद्रपूर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत तो उधळून लावला. पोलिसांनी २ माऊझर गन (पिस्टल), २ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे व ४ खंजर असा तब्बल ₹१७ लाख ४५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला असून, चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे —
चन्द्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी,
बोरिस श्रीनिवास कुसुमा,
मुकेश राजू वर्मा उर्फ टँक्यु,
अमित बाडूकराम सोनकर (सर्व रा. बल्लारपूर).

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती देशी कट्टा घेऊन शहरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी गंजवार्ड परिसरातील दादामिया ट्रान्सपोर्टसमोर सापळा रचला. रात्री दोन चारचाकी व एक दुचाकी वाहनातून आठ जण आले असता पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चार जणांना पकडले, तर इतर चार जण पसार झाले.

वाहनांची तपासणी केली असता २ देशी कट्टे, २ माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे व ४ खंजर असा धक्कादायक शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवण, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, हवालदार लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इमरान शेख आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!