मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आज दुपारच्या सुमारास एक नागरिक काही कामानिमित्त या कार्यालयात गेला असता, तिथे फक्त एक कंत्राटी कामगार उपस्थित होता. बाकी सर्व कर्मचारी सुट्टीवर गेल्याचे त्याने सांगितले.

एकाच दिवशी सर्वच कर्मचारी सुट्टीवर कसे गेले, आणि ती सुट्टी मंजूर कोणी केली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कार्यालयातील पंखे चालू, टेबलवरील फाईल्स तशाच पडलेल्या, असा दृश्य पाहून नागरिक संतप्त झाले.

लोकांच्या कामांसाठी असलेले हे शासकीय कार्यालयच जर नेहमी रिकामे राहत असेल, तर नागरिकांनी आपली कामे कुणाकडे मांडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिम्मेदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष जाते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















