Homeक्राईमवन अधिकाऱ्यांनीच केली हरणाची शिकार, आलापल्ली वन परीक्षेत्रातील घटना

वन अधिकाऱ्यांनीच केली हरणाची शिकार, आलापल्ली वन परीक्षेत्रातील घटना

आलापल्ली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मौल्यवान व दुर्मीळ सागवानासाठी देशभर ख्याती असलेल्या आलापल्ली (ता. अहेरी) वनविभागातून १० जुलै रोजी सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. ९ जुलैला रात्री वनविकास महामंडळाच्या नागेपल्ली येथील कॉलनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या घरात हरीण शिजत असल्याच्या माहितीवरुन उपवनसंरक्षक दीपाली तलतले यांनी कारवाई केली.

शिजवलेल्या मांसासह दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

आलापल्ली येथे घनदाट जंगल असून तेथे विविध वन्यप्राणी आढळतात. ९ जुलैला एका हरणाची शिकार करुन वनकर्मचाऱ्यांनी मांस वाटून घेतले. त्यानंतर ते घरी शिजवले. याच दरम्यान उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांना माहिती मिळाली. त्यांनी अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत ९ जुलै रोजीरात्री ८ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी हरणाचे मांस शिजवित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मांस जप्त केले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वनाधिकाऱ्यांना याच कॉलनीतील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. दहा दिवसांपूर्वीच दीपाली तलमले येथे रुजू झाल्या. वनकायद्यानुसार कारवाईचा पहिला दणका हरणाची शिकार करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना बसल्याने एकच खळबळ उडाली आहे.

किती घरांत शिजले मांस?

सूत्रांच्या माहितीनुसार, वनाधिकाऱ्यांना याच कॉलनीतील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, नेमके किती घरांमध्ये मांस शिजले याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. हरीण शिकार ते मांस वाटून ते शिजवून खाणाऱ्यांची संख्या मोठी असून शकते, यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आढळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

“हरणाची शिकार करुन मांस शिजवले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, संबंधितांच्या घरी धाड टाकून कारवाई केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरुच आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल.”

– दीपाली तलमले, उपवनसंरक्षक, आलापल्ली 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!