Homeताज्या बातम्याविदर्भात पावसाची विश्रांती, पण गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 22 रस्ते, 6 तालुक्यांचा संपर्क...

विदर्भात पावसाची विश्रांती, पण गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 22 रस्ते, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही भागात ही पूरस्थिती हळूहळू निवळताना दिसत आहे.

पूर्व विदर्भात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांमध्ये पुराचे पाणी वेगाने ओसरू लागले आहे. त्यामुळे आजपासून महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने, दोन दिवसात पुरामुळे पूर्व विदर्भात पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या पाच नद्यांना सध्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणची पूर परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि तालुकास्तरावरील २२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चामोर्शीतील चिचडोह धरण १०० टक्के पूर्ण भरले आहे. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा वैनगंगा नदीला मोठा प्रभाव जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांत वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी, वैनगंगा नदीचे पाणी प्राणहिता व इतर नद्यांमध्ये जात असल्यामुळे प्राणहिता नदीत पूर परिस्थिती वाढत आहे.

गडचिरोलीच्या जिल्हा मुख्यालयाशी चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा हे सहा तालुके संपर्काच्या बाहेर आहेत. चामोर्शी आणि आष्टी येथून मार्ग बंद असल्यामुळे, विशेषतः चामोर्शीपासून वैनगंगा नदीला पूर आल्याने या तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!