चामोर्शी मूल फाट्यावरील घटना आरोपी ना अवघ्या काही तासात केले अटक मूल पोलिसांची कारवाही
मूल : रवि बरडे ( तालुका प्रतिनिधी )
दिनांक 15 /7/025 ला रात्रौ 9 च्या सुमारास फिर्यादी चामोर्शी फाटा मूल रोड वरून जात असताना मोटार सायकल क्र M H 34-T 561 वर स्वार दोघे आरोपीनी विवेक कोटनाके यांचे मोबाईल हिसकावून पळून गेले या घटनेची फिर्याद विवेक कोटनाके यांनी मूल पोलीस स्टेशनं ला दिली अपराध क्र 255/025 कलम 304. 3(5) भारतीय न्याय संविधान 2023 अन्वये गुन्हा नोंदविन्यात आला
फिर्यादीनी सांगितल्या प्रमाणे आरोपीचे कपडे चे वर्णन तसेच मोटार सायकल चे क्र वरून आरोपी न 1) तनिश ओम मंडलेकर रा मूल 2) किसन प्रेमदास शेडमके रा. हळदी यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून गुन्ह्यातील चोरलेला मोबाईल पोको किंमत 10000/- आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किंमत 50000/- असे एकून ₹ 60000/- चा माल हस्तगत केला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे
सदर कार्यवाही मुक्काम्मा सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे अप्पर पो. अ. चंद्रपूर आणि सुधाकर यादव उपविभागीय पो. नि. चंद्रपूर प्रभारी मूल यांच्या मार्गदर्शनातं मूल पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी पोहवा. जमीर पठाण, भोजराज मुंडरे, नरेश कोडापे संदिप चुदरी यांनी केली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















