मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवानी आगडे यांनीही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आपले नाव पुढे केले आहे. त्या भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यास उत्सुक असून सध्या त्या पक्षातर्फे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
शिवानी आगडे या मूल शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक संदीप आगडे यांच्या अर्धांगिनी आहेत. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय आहेत.
दरम्यान, निवडणूक जवळ येत असल्याने भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनीही उमेदवार निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, उमेदवारीसाठी सर्वाधिक गर्दी भाजपच्या शिबिरातच होत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















