Homeक्राईममूलमध्ये संतापजनक घटना; मंदबुद्धी महिलेवर अत्याचार, पोलिसांचा आरोपीचा शोध सुरू

मूलमध्ये संतापजनक घटना; मंदबुद्धी महिलेवर अत्याचार, पोलिसांचा आरोपीचा शोध सुरू

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मूल येथील नवभारत विद्यालयासमोरील गेटच्या बाजूला असलेल्या एका दुकानासमोर मंदबुद्धी महिलेवर अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्री अंदाजे १ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवभारत विद्यालय परिसरात एका दुकानासमोर झोपलेल्या मंदबुद्धी महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. दरम्यान परिसरातील काही सुज्ञ नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांचा आवाज ऐकताच आरोपी घटनास्थळावरून पळ काढून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मूल शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!