Homeक्राईमभगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

भगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील भगवानपूर रेतीघाटावरून सध्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. दिवस-रात्र ट्रॅक्टर च्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात असून याकडे महसूल विभागाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून ती विविध ठिकाणी नेली जात आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम होत असल्याने परिसरातील शेतजमिनी व पाण्याच्या प्रवाहावरही परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला असला तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, भगवानपूर रेतीघाटावर सुरू असलेल्या या अवैध रेती तस्करीवर महसूल विभागाने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!