Homeक्राईमबनावट आयकर अधिकाऱ्यांची धमकी; सतर्कतेमुळे मोठी फसवणूक टळली

बनावट आयकर अधिकाऱ्यांची धमकी; सतर्कतेमुळे मोठी फसवणूक टळली

वर्धा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

विविध प्रकारे लोकांची फसवणूक होत असल्याने पोलिसांची सायबर टीम सातत्याने दक्षतेचे इशारे देत असते. तरीदेखील फसवणूक करणारे भामटे नवनवीन क्लृप्त्या लढवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना काल वर्धा शहरात घडली. मात्र काँग्रेस नेत्यांच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबावर ओढवणारे संकट टळले.
स्थानिक रामनगर भागात राहणारे प्रा. चिंतामण कोंगरे हे ‘नुटा’ या प्रख्यात प्राध्यापक संघटनेचे माजी पदाधिकारी आहेत, तर त्यांचे पुत्र प्रा. सुहास कोंगरे हे विद्यमान अध्यक्ष आहेत. आज दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास दोन जण त्यांच्या घरी आले. त्यांनी स्वतःची ओळख आयकर विभागाचे अधिकारी अशी करून दिली.
या दोघांनी कोंगरे कुटुंबाने बेनामी मालमत्ता रोख रकमेने खरेदी केल्याचा आरोप करत घरात प्रवेश केला. कथित अधिकाऱ्यांची नावे किशन ज्ञानेश्वर पर्बत आणि चेतन रमेश चव्हाण अशी सांगण्यात आली. त्यांनी ओळखपत्र व कथित ‘सर्च वॉरंट’ दाखवून घरात व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. तसेच मालमत्तेची कागदपत्रे आणि घरात किती रोख रक्कम आहे, याबाबत चौकशी करत धमकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र या संपूर्ण प्रकारात काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव प्रा. सुहास कोंगरे यांना झाली. त्यांनी तत्काळ सावध भूमिका घेतली. कोंगरे कुटुंबाचे काँग्रेस नेते शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी त्यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
त्यावर हिवरे यांनी, “आमचे सर्व आर्थिक व्यवहार सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडे असतात. तो येत आहे, असे सांगा,” अशी सूचना केली. कोंगरे यांनी तसे सांगताच त्या कथित अधिकाऱ्यांनी “आम्हीच त्या सीएकडे येतो,” असा पवित्रा घेतल्याने संशय अधिकच बळावला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलिसांनाही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या नावाखाली फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी सावध राहावे, अधिकारी म्हणून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची खात्रीशीर ओळख, अधिकृत आदेशपत्र आणि संबंधित विभागाशी दूरध्वनीद्वारे पडताळणी केल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!