मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मूल पोलिसांनी आज दि. 31डिसें. 2025 च्या रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास मूल येथील वॉर्ड क्र. 2, बुद्ध विहार परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई केली. या कारवाईत सुमेध राजु भडके (वय 27) याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन धारदार तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी सदर शस्त्रे जप्त केली आहेत.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध शस्त्र बाळगणे व त्यातून संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सत्यजित आमले (उपविभागीय पोलीस अधिकारी) आणि विजय राठोड (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली सुबोध वंजारी (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांनी केली. पथकात भोजराज मुंडरे, दिलीप आडे व नरेश कोडापे यांचा सहभाग होता.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















