Homeमहत्त्वाचेचंद्रपूरनंतर मूलमध्येही भाजपची शिस्तभंग कारवाई होणार का? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

चंद्रपूरनंतर मूलमध्येही भाजपची शिस्तभंग कारवाई होणार का? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर महानगरपालिकेतील उमेदवार अदलाबदली प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीने महानगर अध्यक्षांवर थेट कारवाई करत कडक संदेश दिला. या पार्श्वभूमीवर आता मूल नगर परिषद निवडणुकीतील उमेदवार बदलाच्या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
मूलमध्ये निवडणुकीदरम्यान काही प्रभागांमध्ये उमेदवारांची नावे बदलल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली होती, आणि भाजपा चा दारुण पराभव झाला होता. स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षशिस्त धोक्यात आली का, तसेच या बदलांमागे कोणाची भूमिका होती, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे चंद्रपूरप्रमाणेच मूलमध्येही संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे जिल्हा व विभागीय नेतृत्व या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. चंद्रपूरमध्ये दाखवलेल्या कडक भूमिकेची पुनरावृत्ती करून पक्षशिस्तीचा संदेश देण्यात येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसली, तरी “चौकशी सुरू आहे” अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे मूलमधील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेतृत्वाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असून, येत्या काही दिवसांत घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!