Homeताज्या बातम्याएटापल्लीतील आलदंडी नदी रेती तस्करीच्या विळख्यात; महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग? संतप्त नागरिकांचा सवाल

एटापल्लीतील आलदंडी नदी रेती तस्करीच्या विळख्यात; महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग? संतप्त नागरिकांचा सवाल

एटापल्ली : तेजस गुज्जलवार (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील बंदिया व आलदंडी नदीपात्रात सध्या अवैध रेती तस्करीचा धुमाकूळ सुरू असून, हे संपूर्ण प्रकरण महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या डोळ्यादेखत चालत असल्याने संतप्त नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर, टिप्पर आणि ट्रकच्या साहाय्याने बेधडकपणे रेती उपसा सुरू असून, यामुळे केवळ पर्यावरणाचेच नव्हे तर ग्रामस्थांचे जीवनही धोक्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आलदंडी नदीपात्रात अवैध रेती उपशाचे प्रमाण भयावह स्वरूप धारण करत आहे. नागरिकांनी वारंवार महसूल आणि वन विभागा कडे तक्रारी दिल्या असूनही आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने तस्करांचे मनोबल अधिकच वाढले आहे. रात्रीच्या वेळी नदीकिनारी वाहने भरधाव वेगात धावत असून, त्यांच्या धुळीच्या लोटामुळे आणि आवाजामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बेकायदेशीर उत्खननामुळे आलदंडी नदीचे नैसर्गिक संतुलन ढासळले आहे. नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत असून, याचा परिणाम संपूर्ण जलसाठ्यावर आणि पशुपालन, शेतीवर होतो आहे. काही ठिकाणी नदीचे प्रवाहच बदलल्याचे चित्र दिसत आहे, जे भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देऊ शकते.

घरभेदी अधिकाऱ्यांच्या संधीसाधूपणामुळेच वाढतेय रेतीतस्करीचे साम्राज्य

एटापल्ली तालुक्यात रेती तस्करीच्या साखळीत महसूल विभागातीलच काही ‘घरभेदी’ अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय भागीदार असल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी अवैध रेती तस्करांवर कारवाईचा इशारा दिला असला, तरी येथे हे आदेश केवळ कागदावरच राहत आहेत. काही अधिकारी तस्करांना वेळेआधी ‘लोकेशन’ व ‘रेकी’ची माहिती देत असून, त्यांचे कॉल डिटेल्स, लोकेशन शेअरिंग, आणि सततचा संपर्क तपासला तर महसूल खात्यातीलच मोठ्या घरभेदी जाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

पावसाळ्याआधीच हजारो ब्रास रेतीचा साठा — कारवाई केवळ दिखावा?

तस्करांनी उन्हाळ्याच्या काळात नदी आणि नाल्यांचे खोदकाम करून हजारो ब्रास रेतीचे साठे आधीच तयार करून ठेवले आहेत. मार्च महिन्यात महसूल विभागाने काही टार्गेट कारवाया केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात साठवलेल्या रेतीपैकी १० टक्केही हस्तगत करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

सध्या देखील रात्रंदिवस अवैध उत्खनन सुरूच असून, यावर कारवाई करण्याऐवजी काही अधिकारी फक्त वसुली करीत असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी तर राजकीय पदाधिकारी, गुन्हेगार व शासकीय कर्मचाऱ्यांची यामध्ये थेट भागीदारी असल्याचेही बोलले जात आहे.

महसूल व वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच अवैध रेती तस्करीला ऊत

सदर रेती तस्करी ही मुख्यत्वे महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या ढिसाळ कार्यपद्धती व सोयीस्कर दुर्लक्षामुळेच बिनधास्तपणे सुरू आहे. या दोन्ही विभागांकडे जबाबदारी असूनही त्यांनी तस्करी रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट, काही वेळा तस्करांना अप्रत्यक्षपणे मूकसंमतीच मिळाल्याचे चित्र दिसून येते. ना नियमित गस्त, ना तपासणी—या निष्क्रीयतेमुळे तस्करांचे धाडस वाढले असून, रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर, टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या विभागांच्या निष्काळजीपणामुळे अधिकच गंभीर झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!