कोरपणा अनिल गेडाम (तालुका प्रतिनिधी)
कत्तलीसाठी गोवंश जनावरांना निर्दयतेने कोंबून अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना गडचांदूर पोलिसांनी अटक करून 8 जनावरांची सुटका केली आहे.पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली कारवाईची धडक मोहीम सुरू आहे.याच श्रेणीत 11 जून बुधवार रोजी डीबीचे पथक पेट्रोलिंगवर असतांना मुखबीर द्वारे खबर मिळाली की,एका वाहनात निर्दयतेने कोंबून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत आहेत.या माहितीवरून पोलिसांनी देवाडा मार्गावर सापळा रचून सदर वाहनाला थांबवले.वाहनाची तपासणी केली असता,त्यामध्ये 8 गोवंश जनावरे आढळून आले.
या संदर्भात पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.ही जनावरे गडचांदूर वरून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याचे आरोपींनी सांगितले आहे.सलीम हबीब सैय्यद वयवर्ष 38,शेख इस्माईल हमीद शेख वयवर्ष 25,दोन्ही गडचांदूर येथील रहिवासी असून पोलिसांनी 1 टाटा इंट्रा वाहन किंमत अंदाजे 5 लाख व 8 नग जनावरे प्रत्येकी किंमत 15 हजार प्रमाणे,असा एकूण 6 लाख,20 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांचा नेतृत्वात पोहवा.शीतल बोरकर,नापोअं.बलवंत शर्मा,पोअं.प्रकाश बाजगीर,पोअं सूरज ढोले,पोअं.साईनाथ उपरे यांनी केली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















