Homeताज्या बातम्याआदर्श शेतकी सहकारी सोसायटीची अविरोध निवडणूक; येनुरकर अध्यक्ष, मारकवार उपाध्यक्ष

आदर्श शेतकी सहकारी सोसायटीची अविरोध निवडणूक; येनुरकर अध्यक्ष, मारकवार उपाध्यक्ष

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल येथील आदर्श शेतकी खरेदी-विक्री सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहात पार पडली. ही निवडणूक काँग्रेस नेते तथा प्रदेश काँग्रेसचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली अविरोध करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी घनश्याम येनुरकर तर उपाध्यक्षपदी राजू पाटील मारकवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच संचालक मंडळात न.प. उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष संदीप कारमवार, प्रायमरी सोसायटी अध्यक्ष धनंजय चिंतावार, रुमदेव गोहने, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला आत्राम, स्मिता कामडे, गणेश खोब्रागडे, जीवराज ठेमस्कर यांचीही अविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष घनश्याम येनुरकर व उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सातत्याने काम करू. त्यांना योग्य दरात खत, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू.”
दरम्यान, काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष एकता समर्थ, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, न.प. बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार यांनी मानले.
यावेळी मंचावर मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, उपाध्यक्ष विनोद गाजेवार, नगर परिषद सभापती, नगरसेवक, सरपंच, काँग्रेस पदाधिकारी, बाजार समिती संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!