Homeताज्या बातम्यासुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन; संगीतविश्वावर शोककळा

सुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन; संगीतविश्वावर शोककळा

मुंबई : (विशेष प्रतिनिधी)

भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली तब्बल सात दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
आशा भोसले यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन संगीतसृष्टीत अमूल्य ठेवा निर्माण केला. त्यांचा मधुर, लवचिक आणि भावपूर्ण आवाज पिढ्यानपिढ्या रसिकांच्या हृदयात घर करून राहिला आहे.
गझल, पॉप, भक्तिगीत, चित्रपटगीत अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. त्यांच्या गायकीतली विविधता आणि ऊर्जा यामुळे त्या सदैव खास ठरल्या. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आशाताईंचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
आशाताईंच्या निधनाने केवळ बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण संगीतविश्वाने एक महान स्वरगंधर्व गमावला आहे. त्यांच्या सुरांची साथ आता कायमची थांबली असली, तरी त्यांच्या आवाजातील जादू सदैव जिवंत राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!