Homeताज्या बातम्यासोमनाथ मंदिराला मिळाला ‘तीर्थक्षेत्र ब दर्जा’; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना...

सोमनाथ मंदिराला मिळाला ‘तीर्थक्षेत्र ब दर्जा’; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला अखेर ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जा मिळाला आहे. राज्य सरकारकडून झालेला हा महत्त्वाचा निर्णय हा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ठोस पाठपुराव्याचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमनाथ मंदिर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा, परिसराला योग्य ओळख मिळावी तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जाची घोषणा करण्यात आली.

या निर्णयामुळे सोमनाथ मंदिर परिसरात नियोजित व वेगवान विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. तीर्थक्षेत्र दर्जामुळॆ मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उभारणी, पर्यटक केंद्र, सौंदर्यीकरण, आधुनिक सुविधा, पार्किंग, स्वच्छता व्यवस्था तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक प्रकल्प उभारले जाणार आहेत. या उपक्रमांचा थेट फायदा स्थानिकांना रोजगाराच्या स्वरूपात मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर शासनस्तरावरून विशेष निधी मंजुरी, विकास आराखड्याची अंमलबजावणी आणि पर्यटन वाढीसाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे सोमनाथ मंदिर प्रदेश धार्मिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून, मूल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

या निर्णयाचे स्वागत करत तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि श्रद्धाळूंनी समाधान व्यक्त केले आहे. मंदिराला मिळालेला हा मान मूल तालुक्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!