मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चिचाळा – केळझर जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षाकडून श्री. अखिल गांगरेड्डीवार यांची उमेदवारी सर्वाधिक मजबूत मानली जात असून, त्यामुळे पक्षातील काही इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही जण त्यांच्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचत असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात ५०० हून अधिक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्ष सोडून माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भेजगाव येथे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात नवा अध्याय सुरू केला होता.
अखिल गांगरेड्डीवार यांनी भेजगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच, सरपंच, तसेच सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या ते कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी ते नेहमी पुढाकार घेत असल्याने त्यांना कार्यकर्त्यांचा प्रचंड पाठिंबा आहे.
पिढीतून गरीबांच्या हाकेला धावून जाणारे आणि लोकांशी घट्ट नातं ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अखिल गांगरेड्डीवार हे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विश्वासू मानले जातात.
या क्षेत्रात त्यांनी दावेदारी सादर केल्यामुळे काही ‘फक्त खुर्चीसाठी’ राजकारण करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, बदनामीचे डाव आखत आहेत. मात्र कार्यकर्ते व पदाधिकारी गांगरेड्डीवार यांच्या ठाम पाठीशी असल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास पक्की असल्याचे चर्चेत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















