मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
भारतीय जनता पक्षाच्या मुल तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये अलीकडेच नव्याने आलेल्या एका कार्यकर्त्यामुळे मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडील एका कार्यक्रमानंतर ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आल्याने, संबंधित कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे.
मुल नगर परिषद निवडणुकीसाठी यंदा ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्यानंतर, त्या कार्यकर्त्याने आपल्या उच्चशिक्षित पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी काही पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन राजकीय शतरंजी डावपेच रचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेत, “आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच ठरवावे — पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांची गरज आहे की, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची?” अशी मागणी व्यक्त केली आहे.
या सर्व घटनांमुळे मुल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून अंतर्गत तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















