Homeताज्या बातम्याजनतेच्या मनाशी नातं जोडणारं केंद्र : जितेशभाऊ कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार...

जनतेच्या मनाशी नातं जोडणारं केंद्र : जितेशभाऊ कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

– गोरगरीब, शेतकरी, कामकरी, युवक-युवती व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचं केंद्र ठरणार.

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आघाडी महानगर, चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख जितेशभाऊ कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवारी (दि. 19 ऑक्टोबर 2025) सायंकाळी पाच वाजता उत्साहात पार पडले.
या उद्घाटनाचा मान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना लाभला. दुर्गामाता मंदिराजवळ, एम.बी. मॉडेल्स स्कूल, कृष्णानगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

आमदार किशोर जोरगेवार यांचा संदेश :

उद्घाटन प्रसंगी आमदार किशोरभाऊ जोरगेवार म्हणाले,
“जितेशभाऊंचे जनसंपर्क कार्यालय हे फक्त एक कार्यालय नाही, तर गोरगरीब, शेतकरी, कामकरी, मजूर, युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र ठरावे. हे कार्यालय लोकांच्या आशा-अपेक्षांचं प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले,
“प्रभागात सकाळी फिरून नागरिकांच्या समस्या स्वतः शोधणारा, लोकांशी थेट संवाद साधणारा आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणजेच जितेशभाऊ कुळमेथे. त्यांचा लोकसंपर्क आणि कार्यशैली हाच भाजपचा खरा चेहरा आहे.”

जनतेच्या सेवेसाठी खुले कार्यालय :

आपल्या मनोगतात जितेशभाऊ कुळमेथे म्हणाले,
“हे कार्यालय माझे नसून जनतेचे आहे. येथून प्रत्येक गोरगरीब, शेतकरी, मजूर, युवक-युवतींच्या अडचणींवर तत्परतेने उपाययोजना केली जाईल. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रशासनाचे लाभ पोहोचविण्याचे हे केंद्र ठरेल.”

कार्यक्रमात उत्साहाचा माहोल :

या प्रसंगी मंचावर भाजप शहर जिल्हाध्यक्ष श्री.सुभाषजी कसूनगोट्टूवार,श्री.रविजी गुरूनुले महामंत्री,श्री.श्यामजी कनकम महामंत्री सौ.सविताताई दांडारे महामंत्री सौ.सारिकाताई संदूरकर मंडळ अध्यक्षा श्री रघुवीरजी अहिर,श्री दिनकरजी सोमलकर प्रभारी मंडळ अध्यक्ष श्री.पप्पूजी बापचे,श्री तपोष डे श्री प्रलयजी सरकार, श्री सुशांतजी भद्रा,श्री अलीममामू शेख, तथा अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी व घोषणांमध्ये उद्घाटनाचा सोहळा जल्लोषात पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम खैरे यांनी केले, तर प्रास्ताविक स्वतः जितेश कुळमेथे यांनी सादर केले. व आभार प्रदर्शन सुधाकर राखुंडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री.सिद्धार्थजी मेश्राम प्रवीण पंचबुधे ,एकनाथ मोहितकर,मुन्ना जाधव,विजय पाटील ,मनोज गणवीर विजय देशपांडे,निखिल कोडापे,महेश चहारे,मोरेश्वर मडावी,बाळू कुलमेथे,मुकेश पुरडकर,अविनाश मडावी सिंपल उरकुंडे, अतुल बोडे, दिलीप साहू, परशुराम चव्हाण ,अमित वाघमारे,प्रकाश राणे ,वैभव आंबाडे ,गजानन राऊत,विराज सुरपाम,राधेश्याम यादव,राकेश झुंगारे,कस्तुब महाकुलकर ,दिनेश शिंदे,करण पवार,अमित डाखवा ,मंगेश जाधव,मुकेश चित्रे ,प्रशांत खंडारे,दीप गजभिये समीर शेख,मौसिम शेख,रामभरोस निषाद,प्रभात निषाद,हर्षद चिरडे सौ.पूनम साहू सौ.सविता आगळे सौ.सुकन्या कापसे सौ.अनिमा भद्रा सौ.कृष्णा भद्रा सौ.प्रणोती मंडल सौ.माधुरी ढाली सौ.अंजली विश्वास सौ.पुष्पा मिस्त्री सौ.सविता हजारे सौ.कल्पना सरकार सौ.चंदाबाई दुर्गेवार सौ.यशोदा आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कृष्णानगर परिसरात ‘जनतेसाठी खुले कार्यालय’ या संकल्पनेने सुरु झालेले हे जनसंपर्क केंद्र नागरिकांमध्ये आशेचा किरण ठरत असून — “आपल्यासाठी कुणीतरी आहे” असा विश्वास आता लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!