गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात सुरक्षा दलांच्या जवानांवर घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत ही धडक मोहीम पार पाडली.
अटक झालेल्याचे नाव सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (३८, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) असे आहे. त्याच्या अटकेमुळे जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
घटना दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी घडली. भामरागड पोस्टेतील पोलीस पथक व सीआरपीएफ जवान माओवादविरोधी अभियानात असताना इंटेलिजन्स सेल प्राणहिता यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक संशयित जवानांची रेकी करत आहे.
तात्काळ कारवाई करून जवानांनी त्याला पकडले. प्राथमिक चौकशीत उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आणून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















