Homeक्राईमआयशर ट्रकमधून २० जनावरांची सुटका, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

आयशर ट्रकमधून २० जनावरांची सुटका, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

वर्धा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी तस्करी होत असलेली २० जनावरे वाचवली. ही कारवाई समृद्धी महामार्गावर केळझर येथे करण्यात आली.

रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना एम.एच. १६ सी.सी. ०२९० या आयशर ट्रकमधून जनावरे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना माहिती दिल्यानंतर तात्काळ नाकेबंदी करण्यात आली.

वाहन तपासणी दरम्यान ४ म्हशी आणि १६ हेले आढळले. ट्रकमधील आरोपींमध्ये शेख मुस्ताफ शेख शौकत (रा. धुळे), शेख रशिद (रा. नगर, मालेगाव), लिनर अल्ताफ अहमद मुस्ताफ अहमद कुरेशी (रा. गांधीनगर कामठी) यांना ताब्यात घेण्यात आले असून वकील अहमद (रा. नागपूर) पसार आहे.

या कारवाईत १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका केलेली जनावरे चारापाणी व वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोदय गोशाळा, पडेगाव येथे हलविण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, सागर भोसले, मिथून जिचकार, दीपक साठे, अखिल इंगळे आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!