जमिनीची सुपीकता वाढविणे काळाची गरज – गटविकास अधिकारी नितीन फुलझेले याचे शेतकऱ्यांना आव्हाहन
रवि बरडे ( तालुका प्रतिनिधी)
चिमूर पं. सं. तर्फे खडसंगी येथे दि. 1 जुलै 025 रोजी वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात कृषी विषयक योजनाची माहिती डाँ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी योजना व जिल्हा परिषद स्वनिधी योजनाची माहिती देण्यात आली कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गट विकास अधिकारी फुलझेले यांनी जमिनीची सुपीकता वाढविणे गरजेचे आहे तसेच शेतीला जोड धंद्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांनि नकारात्मक असण्यापेक्षा स्वीकारात्मक असणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांना
करताना सांगितले यावेळी शेतकऱ्यांना ड्रोन मार्फत कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
सदर कार्यक्रमला पं. सं. चिमूर चे गट विकास अधिकारी नितीन फुलझेले सहा. गट विकास अधीकारी अशोक श्यामकुळे, कृषी अधिकारी संजय कांबळे कृषी विस्तार अधि. काशिनाथ वेलदी मंडळ कृषी अधिकारी शेंडे कु. पिंपळकर कृषी सहाय्यक कु तुराणकर, धाडवे, येसाणकर, घाटे, सोनवणे कृषी पर्य वेक्षक व कृषी विभागाचे कर्मचारी तसेच शासनाचे शेतीनिस्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी मोरेश्वर झाडें, हेमंत शेंद्रे, संदिप भोस्कर उपसरपंच खडसंगी ग्रा. पं. सदस्य झाडें, सिमा वाकडे, शिल्पा गेडाम, संध्या ससाणे, रुपचंद शास्तकर ग्रामपंचायत अधिकारी मडावी, बांगडे, उराडे, राठोड, तालुक्यातील सरपंच तसेच शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन पं. सं. चे कृषी अधिकारी संजय कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी आकाश कवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















