Homeताज्या बातम्याविदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली.

त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे मोठ्या संख्येत चाहते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आले अन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली.

ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी वर्धा मतदार लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते ३ वेळा विधान परिषद सदस्यही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी ते १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

वर्धा येथील सावंगी मेघे येथे त्यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते.

मृत्युपत्रात कुठेही काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात केंद्रीय नितीन गडकरी यांचे नाव लिहिले असल्याचे गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केले होते. यावरून त्यांच्यातील एक मित्रही पुढे आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!