मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. गजानन मधुकर वलकेवार यांनी राजोली – मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून आपली दावेदारी जाहीर केली आहे.
वलकेवार हे विद्यार्थी जीवनापासूनच राजकारणाशी जोडलेले असून त्यांनी भारतीय जनता पक्षात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ते नेहमीच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहिले असून, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेत आले आहेत.
स्वतःबद्दल बोलताना श्री. वलकेवार म्हणाले,
“या क्षेत्रातील जनतेच्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम आणि विश्वास हेच माझ्या विजयाचे खरे शिल्पकार असतील. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे.”
त्यांच्या या दावेदारीमुळे राजोली – मारोडा परिसरात राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















