Homeक्राईममद्यधुंद ट्रकचालकाची ट्रॅक्टरला जोरदार धडक — दोन ठार, तिघे गंभीर जखमी

मद्यधुंद ट्रकचालकाची ट्रॅक्टरला जोरदार धडक — दोन ठार, तिघे गंभीर जखमी

कोरची : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिलेल्या भीषण धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास कोरचीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव फाट्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
या अपघातात सागर कल्लो (१९), रा. झेंडेपार ता. कोरची व कैलास कोवे (३५), रा. मोहगाव ता. कुरखेडा यांचा मृत्यू झाला. तर राजेश गंगबोईर (२८), रा. चमरोटोला ता. मोहल्ला (छत्तीसगड), पुरुषोत्तम मडकाम (५१), रा. चिचोली ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच प्रदीप नैताम हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंधाऱ्याच्या कामावर जात असताना अपघात

जलसंधारण विभागामार्फत झेंडेपार गावाजवळ बंधाऱ्याचे काम सुरू असून त्या कामासाठी चांदोना येथून सेंट्रींग साहित्य घेऊन एमएच-४०-बी-९५७३ क्रमांकाचा ट्रॅक्टर जात होता. त्याच वेळी हैदराबादहून कोरचीमार्गे रायपूरकडे जाणाऱ्या सीसी-०७-बीए-९२८४ क्रमांकाच्या ट्रकने मोहगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टर उलटून चार मजूर खाली दबले तर एक जण बाहेर फेकला गेला. ट्रॅक्टरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

नागरिक व पोलिसांची तत्पर मदत

घटनेची माहिती मिळताच मोहगाव येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दिनेश खटोले, कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले.
जखमींवर डॉ. चेतना सिडाम व डॉ. शिव पुंडे यांनी प्रथमोपचार केले. मात्र कोरची ग्रामीण रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी चंद्रपूर येथे गेल्याने कुरखेडा येथून रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडचिरोली येथे हलविण्यात आले.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!