Homeआरोग्यबातमीमुळे खळबळ; लखन मानकानीचा संपादकाशी संपर्काचा प्रयत्न

बातमीमुळे खळबळ; लखन मानकानीचा संपादकाशी संपर्काचा प्रयत्न

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

शहरात सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यवसायाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर संबंधित प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, मुख्य आरोपी लखन मानकानी याने न्यूज 7 मराठीचे संपादक सतीश आकुलवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी मूल शहर परिसरात सुगंधित तंबाखूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची बातमी प्रसारित झाली होती. संबंधित कारवाईदरम्यान लखन मानकानी फरार झाल्याची माहिती होती. त्यानंतर न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा आपला व्यवसाय पूर्ववत सुरू केल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) कर्मचारी मूल येथील गांधी चौक परिसरात लखन मानकानी याची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली असून, या भेटीमुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, सदर बातमी प्रसारित झाल्यानंतर लखन मानकानी याने न्यूज 7 मराठीचे संपादक सतीश आकुलवार यांच्याशी सलग तीन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र या संपर्कामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, शहरात खुलेआम सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, संबंधित विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!