Homeताज्या बातम्याफिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळी

फिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आज रात्री अंदाजे दीड वाजताच्या सुमारास फिस्कुटी परिसरात वाघाने हल्ला करून एका मेंढपाळाला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव गणपत कंकलवार (वय 36 वर्ष) रा. जुनासूर्ला हे मेंढपाळ असून मेंढ्यांची लाग बसवून झोपले होते. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ मारोती कंकलवार यांची पत्नी वनिता देखील उपस्थित होत्या.
फिस्कुटी येथील महाकाली मंदिराजवळ रामदास जेंगठे यांच्या शेतात मेंढ्यांची लाग बसवून ते झोपले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वासुदेव कंकलवार यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग, वन विभाग तसेच फिस्कुटी येथील सरपंच नितीन गुरनुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करण्यासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!