मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगर परिषद प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे असलेले श्री. नंदकिशोर रणदिवे यांची उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण शहरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत याच प्रभागातून विजयी होत त्यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविण्याचा मान मिळवला होता. त्या काळात केलेल्या विकासकामांमुळे आणि लोकसहभागातून चालविलेल्या उपक्रमांमुळे रणदिवे यांची ओळख काम करणारे, जनतेसाठी नेहमी उपलब्ध असलेले नेते अशी निर्माण झाली.
उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील दैनंदिन समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती यावर विशेष लक्ष केंद्रित केले. नागरिकांच्या प्रत्येक समस्येला तत्पर प्रतिसाद देणारे आणि कोणत्याही सामाजिक प्रसंगी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वदूर परिचित झाले आहेत. विरोधकही त्यांच्या कार्यशैलीची दाद देतात, हीच त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.
प्रभाग 6 मध्ये रणदिवे यांच्या विजयाची शक्यता निश्चित मानली जात असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. त्यांना पुन्हा याच प्रभागातून उमेदवारी मिळाल्याने स्थानिक रहिवासी आनंदी असून आगामी निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत नागरिकांनी या क्षेत्राचे आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. विकासाभिमुख नेतृत्व आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यांमुळे प्रभाग 6 मध्ये रणदिवे यांची उपस्थिती अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















