Homeक्राईमपत्नीच्या चारित्र्यावर संशयातून हत्याकांड; पतीनेही संपवले आयुष्य, चार मुले पोरकी

पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून हत्याकांड; पतीनेही संपवले आयुष्य, चार मुले पोरकी

धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गडचिरोली जिल्हा येथील धानोरा तालुका संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका भीषण घटनेचा साक्षीदार ठरला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या दुर्दैवी प्रकारामुळे चार निष्पाप मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
धानोरा तालुक्यातील दुर्गम रोपीनगड्डा गावातील कनिष्ठा राकेश कुजूर (वय 32) आणि राकेश सुकणा कुजूर (वय 37) हे मृत दाम्पत्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी दोघेही शेतात धान कापणीचे काम आटोपून “घरी जातो” असे सांगून निघाले; मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. दोन दिवसांनी, 7 जानेवारीला गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठा कुजूर यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने जोरदार वार केल्याचे स्पष्ट झाले.
पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर पती राकेश कुजूर याचा शोध सुरू करण्यात आला. अखेर 8 जानेवारी रोजी राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. प्राथमिक तपासात पत्नीच्या हत्येनंतर पश्चात्ताप, भीती किंवा अटकेच्या भीतीपोटी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. राकेश कुजूर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो वारंवार पत्नीशी भांडण करत असे. या वादांमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. याच कारणामुळे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गावात पंचायतही बसवण्यात आली होती; तेव्हा राकेशला समज देण्यात आली होती आणि काही काळ परिस्थिती शांतही झाली होती. मात्र, संशयाने पुन्हा एकदा कुटुंबाचा अंत केला.
या घटनेत मानवी (12), मेहमा (9), अर्णव (7) आणि शालिनी (5) अशी चार लहान मुले अनाथ झाली आहेत. यातील तीन मुले देऊळगाव येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर या चारही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आता त्यांच्या 80 वर्षीय आजोबा सुकणा कुजूर यांच्या खांद्यावर आली आहे. उतारवयात मुलगा-सून गमावल्यानंतर नातवंडांच्या भविष्याची चिंता त्यांना भेडसावत आहे.
या प्रकरणी पेंढरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी गोपीचंद लोखंडे यांनी सांगितले की, “कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली असून, त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.” या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समाजमनाला हादरवून टाकणारा हा प्रकार ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!