मुल : सतिश आकुलवार (मुख्य संपादक )
सध्या मूल शहरात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रुपये घेऊन फसवणूक करणारे राजू पुद्दटवार आणि नाना आक्केवार यांची चर्चा चांगलीच रंगली असून आपल्या जवळच्या नातेवाईकांना फसवणूक केल्याच्या तक्रारी मुल पोलीस स्टेशन ला झाल्या असून ह्या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर काल दिनांक 20 जून 2025 ला राजु पुद्दटवार ने मुल पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुल पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तालुका क्रिडा अधिकारी विनोद लक्ष्मण ठिकरे राह. अरसोडी ता. आणि जि. वर्धा यांनी मुल पोलिसात तक्रार दिली असून मुलगा मंदार याला तलाठी या पदावर नोकरी लावून देतो म्हणून नाना उर्फ प्रशांत आक्केवार याने सप्टेंबर 2024 पासून 6 मार्च 2025 पर्यंत गुगल पे आणि नेट बँकिंग द्वारे 28 लाख 26 हजार घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. नाना आक्केवार हा क्रीडा संकुल येथे कंत्राटी पद्धतीने काम करत होता. आणि तोच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक करून नटवरलाल ला हि मागे टाकल्याची चर्चा मुल शहरात होत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















