Homeताज्या बातम्याचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक: काँग्रेस-भाजपमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड गोंधळ, गटबाजी उघड

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक: काँग्रेस-भाजपमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड गोंधळ, गटबाजी उघड

चंद्रपूर : सुरज मांदाडे (उप संपादक)

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दिवसभर जोरदार रस्सीखेच, गोंधळ, आक्रोश आणि उघड गटबाजीचे दर्शन घडले.

काँग्रेसमध्ये धानोरकर–वडेट्टीवार शीतयुद्ध

काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेले शीतयुद्ध तिकीट वाटपात स्पष्टपणे समोर आले. तिकीट वाटपावर खासदार धानोरकर यांचाच वरचष्मा राहिल्याचे चित्र दिसले, तर आमदार वडेट्टीवार यांच्या समर्थक माजी नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात डिच्चू देण्यात आला. यामुळे संतप्त झालेले वडेट्टीवार यांनी बैठक अर्धवट सोडून घरी निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तिकीट वाटपात आमदार वडेट्टीवार यांचे समर्थक माजी शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, सुनिता लोढिया, विना खनके, सकिना अन्सारी यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आली.
दरम्यान, जनविकास सेनेशी आघाडी करताना सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या अटीवरून काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी सुनिता लोढिया यांचे नाव काँग्रेसच्या यादीतून वगळून त्यांच्या जागी जनविकास सेनेच्या मनिषा बोबडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या तिकीट वाटपात खासदार प्रतिभा धानोरकर यांचाच बोलबाला राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.
काँग्रेसची उमेदवार यादी शेवटपर्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती, जेणेकरून बंडखोरी टाळता येईल. मात्र अंतिम क्षणी वडेट्टीवार समर्थकांना तिकीट नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. “समर्थकांची उमेदवारी कापताना आमदार वडेट्टीवार एक शब्दही बोलले नाहीत, उलट घरी जाऊन झोपून गेले,” असा आरोप करत नाराज नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपमध्येही वर्चस्वाची लढाई

दुसरीकडे भाजपमध्येही यंदा तिकीट वाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत पक्षाचे वरिष्ठ नेतेही हतबल झाल्याचे चित्र होते.
ज्या हॉटेलमध्ये उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू होते, तेथे मोठा गोंधळ उडाला. उमेदवारी न मिळाल्याने चंद्रकला सोयाम यांनी निरीक्षकांची गाडी रोखत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी थेट आमदार जोरगेवार यांच्यावर रोष व्यक्त केला. तर अजय सरकार आणि पूजा पोतराजे यांच्या उमेदवारीवरून आमदार जोरगेवार नाराज असल्याचे दिसून आले. भाजपमध्ये विशाल निंबाळकर, प्रज्ज्वलंत कडू, राजेंद्र अडपेवार, राजेंद्र गांधी, शीला चव्हाण आदींची तिकीटे कापण्यात आली. पूजा पोतराजे आणि अजय सरकार यांच्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम राहिला. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्यांना तिकीट दिले जाणार नाही, अशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याचदरम्यान एका उमेदवाराने हॉटेलमध्येच एका महिला नेत्या यांच्यावर “तुमच्यामुळेच माझी तिकीट कापली” असा आरोप करत जोरदार गोंधळ घातल्याचीही माहिती आहे.

बंडखोरीची शक्यता वाढली

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील या गोंधळामुळे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाराज नेते आणि कार्यकर्त्यांचा रोष कसा शांत केला जाणार आणि पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!