Homeक्राईम"सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी": विजय वडेट्टीवार

“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून अवघे एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र सावकारांच्या अवाजवी व्याजामुळे ही रक्कम तब्बल ७४ लाखांपर्यंत पोहोचली, आणि अखेर कर्जफेडीसाठी किडनी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही घटना अत्यंत धक्कादायक असून, अशा प्रकारे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकण्यास भाग पाडणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने केवळ SIT नेमली तरी ते पुरेसे नाही. शेतकऱ्यांना छळून पैसे लुबाडणाऱ्या सावकारांचे संघटित रॅकेट राज्यभर कार्यरत आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विशेष पथके स्थापन करून या रॅकेटचा पर्दाफाश केला पाहिजे.”

सरकारवर घणाघाती टीका

महायुती सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ आल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, “या सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येऐवजी आता अवयव विकण्यापर्यंत मजल मारत आहे, ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.”

सोशल मीडियातून रॅकेट सक्रिय?

या प्रकरणामागे डॉक्टर, एजंट आणि मध्यस्थ यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत वडेट्टीवार यांनी सांगितले की, “किडनी विक्रीचे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सक्रिय असू शकते. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

या प्रकरणाची व्यापक आणि निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत, सावकारशाहीविरोधात कडक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!