मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मुल तालुका बार असोसिएशन च्या सन 2025-28 त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष एड. विलास वसंतराव जांगडे तर सचिव पदी एड. प्रीतम प्रभाकर नागपूर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी एड. आदर्श गेडाम यांची नियुक्ती केली होती. पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये उपाध्यक्ष एड. सागर चंद्रकांत मुद्दमवार, सहसचिव एड. अनंत रामचंद्र बल्लेवार, कोषाध्यक्ष एड. संगीता श्रीपती धार्मिक तर सदस्य एड. चांदणी बाबरे, एड. सरोजनी पाटील, एड. पल्लवी शेंडे, एड. स्नेहल भडके, एड. आझादब्रम्ह नागोशे, एड. शालिकराम ठीकरे यांची हि अविरोध निवड झाली. समस्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा….!!!

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















