आज होणार स्पर्धेचे भव्य दिव्य उदघाटन सोहळा, क्रीडा प्रेमीसाठी मोठी मेजवानी
मूल : रविंद्र बरडे (तालुका प्रतिनिधी)
युथ स्पोर्टींग क्लब मूल तर्फे दिनांक 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 ला तालुका स्टेडियम वर पुरुषांचे खुले भव्य व्हॉलि्बॉल स्पर्धेचे आयोजन करणात आले आहे मूल मध्ये खूप वर्षानंतर व्हॉलि्बॉल सामन्याचे आयोजन केल्याने क्रीडा प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे
या स्पर्धेचे आज उदघाटन काँग्रेस नेते मान. संतोषसिंह रावत नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ ,
राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ, प्रभाकर भोयर व इतर मान्यवरांचे हस्ते सायंकाळी 7 वाजता होणार आहे या स्पर्धे करिता प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, बक्षीस राहणार असून सोबतच इतरही आकर्षक बक्षीस राहणार आहे बाहेर गावचे नामांकित स्पर्धक मूल च्या स्टेडियम वर खेळताना दिसणार आहे या स्पर्धेच्या तयारी करण्यात मंडळाचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत
स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने क्रीडा रसिकानी उपस्थित राहून खेळाचे आनंद घ्यावे असे मंडळाच्या अध्यक्ष यांनी सांगितले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















