Homeक्राईममूल शहरातील सुनिल गेडाम हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी

मूल शहरातील सुनिल गेडाम हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल शहरातील निर्दोष सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनिल कालिदास गेडाम यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट उसळली आहे. शहरातील नागरिकांनी शासन व प्रशासनाला निवेदन देत या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी भिमवाडी वसाहत भागात सुनिल गेडाम यांची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण मूल शहर हादरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. यंदाच्या वर्षात मूल तालुक्यात तब्बल सहा हत्यांची प्रकरणे घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शांतताप्रिय गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल शहरात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन व तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून, मूल परिसर गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले आहेत. यावरून स्थानिक पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था टिकविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत पुढे म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मगाव असलेल्या मूल शहरात निर्दोष नागरिकांची हत्या होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणाची काटेकोर चौकशी करून, शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी दबंग व निर्भीड पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच परप्रांतीय व तडीपार संशयितांची तपासणी करून त्यांना शहरातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास मूल वासीय जनता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!