मूल : रवि बरडे (तालुका प्रतिनिधी)
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शेतकरी संजय आकुलवार यांच्या शेतात तब्बल 13 फूट लांबीचा अजगर आढळून आला. आकुलवार यांनी तत्काळ संजीवन पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते उमेश झिरे यांना या घटनेची माहिती दिली.

उमेश झिरे यांनी टीममधील सदस्य प्रशांत मुत्यारवार, दिनेश खेवले व तरुण उपाध्ये यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. या मोहिमेत गावचे सरपंच रणजित समर्थ यांनीही सहकार्य केले.
दरम्यान, गावात 13 फूट लांबीचा अजगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पकडलेला अजगर सुरक्षित स्थळी सोडण्यात आला.
शेतकरी संजय आकुलवार यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















