Homeताज्या बातम्यागोंडवाना विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व बेस्ट फिजिक्स स्पर्धा उत्साहात पार

गोंडवाना विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व बेस्ट फिजिक्स स्पर्धा उत्साहात पार

मूल : भगवान मोहुर्ले (तालुका प्रतिनिधी,)

दिनांक 9 ऑक्टोबर, गुरुवार रोजी तालुका क्रीडा संकुल, मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन ग्रुप ऑफ फिट लिफ्टरचे संचालक व एन.आय.एस. कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मवीर महाविद्यालय, मूल, डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, डॉ. शांताराम पोटदुखे महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, घुघूस, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांसह तीस ते चाळीस महाविद्यालयांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. अखिलभाऊ गांगरेडिवार (अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धर्मेंद्रभाऊ सूत्रपवार आणि श्री. राकेशभाऊ सातपैसे उपस्थित होते.

उद्घाटनानंतर लगेच स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध वजनी गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकाविला. तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रातील महिमा वाघ आणि आचल करंजेकर यांनी आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत गोंडवाना विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले. हे विजेते खेळाडू आता अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धा कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय यशस्वीपणे पार पडली. याचे श्रेय प्रशिक्षक करण कोसरे यांना दिले जात आहे. स्पर्धेच्या आयोजनात अमोल आवडे, आकाश चौधरी, पंकज बेले, दीपक भांडारकर, विष्णूवर्धन येरमी, भूषण देशमुख, शार्विल देअरकर, आकाश भाऊ यांनी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून सहकार्य केले.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉ. अनिता लोखंडे मॅडम यांनी करण कोसरे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी श्री. विनोद ठीकरे, तालुका क्रीडा संयोजक श्री. नामदेव पिजुरकर, डॉ. आशिष चहारे, डॉ. विक्की पेटकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!