Homeशहरअपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा : आ. डॉ. मिलींद नरोटे

अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा : आ. डॉ. मिलींद नरोटे

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, या पृष्ठभूमीवर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची निर्देश दिले.

गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अपघातांची संख्या चिंताजनकरित्या वाढली असून, अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे. अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गंभीर परिस्थितीला प्रशासनाने गांभीर्याने घेत तात्काळ पुढील उपाययोजना कराव्यात, असेही आमदार डॉ. नरोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अवजड वाहने व ट्रक यांना वेगमर्यादेचे कठोर पालन बंधनकारक करावे, महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील अवैध पार्किंग हटवून अधिकृत पार्किंगची व्यवस्था करावी, गर्दीच्या वेळेत वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणात ठेवावी, अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, स्पीड गन, ड्रायव्हर टेस्ट व ब्रेथ अ‍ॅनालाईझर यंत्रणा प्रभावीपणे वापराव्यात, वाहनचालकांसाठी जनजागृती व प्रशिक्षण मोहीम राबवावी, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती प्रशासनिक कार्यवाही करावी, गडचिरोली शहरात व जिल्हाभरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी व ते 24 तास कार्यरत राहतील यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी, गडचिरोलीतील जनतेचे प्राण वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही आमदार डॉ. नरोटे यांनी म्हटले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, भाजयुमो जिल्हा महामंत्री मंगेश रणदिवे, शिवसेना जिल्हा संयोजक हेमंत जम्बेवार, भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष विशाल हरडे, विजय कृपाकर, आशिष मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!