Homeताज्या बातम्याचंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापती

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापती

ब्रेकिंग न्यूज
मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणीमेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडीविदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळामूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखलचंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापतीमूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजनफिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळीपोलीस पाटीलच अवैध दारू व्यवसायाला पाठीशी? ताडाळा गावात चर्चांना उधाणभगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक वसंता देशमुख यांचा पराभव केला.
गिऱ्हे यांच्या विजयामुळे महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी तिन्ही महत्त्वाची पदे आता सत्ताधारी भाजप व शिवसेना (ठाकरे गट) युतीकडे आली आहेत.
यापूर्वी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुका राज्यभर चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगरसेविका मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंता देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे दोघांमध्ये थेट लढत झाली.
एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीत सत्ताधारी भाजप–शिवसेना आणि विरोधी काँग्रेस–जनविकास सेना युतीचे प्रत्येकी ८ सदस्य होते. त्यामुळे निकालाबाबत शेवटपर्यंत उत्सुकता कायम होती. भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटाचे अनुक्रमे दोन आणि चार सदस्य असल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या मनस्वी गिऱ्हे यांनाच मतदान करण्याच्या सूचना दिल्याचे पत्र आल्यानंतर भाजपच्या सदस्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आणि सर्व सदस्य एकत्र आले. अखेर झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मनस्वी संदीप गिऱ्हे यांचे नाव निघाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड निश्चित झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

error: Content is protected !!