Homeताज्या बातम्याफिरकुटी–विरई परिसरात ‘समर्थ अ‍ॅग्री टुरिझम’चे भव्य उद्घाटन १५ फेब्रुवारीला

फिरकुटी–विरई परिसरात ‘समर्थ अ‍ॅग्री टुरिझम’चे भव्य उद्घाटन १५ फेब्रुवारीला

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल तालुक्यातील फिरकुटी–विरई येथे हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात उभारण्यात आलेल्या ‘समर्थ अ‍ॅग्री टुरिझम’ या अनोख्या पिकनिक स्पॉटचे भव्य उद्घाटन रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. कुटुंबिय व मित्रपरिवारासोबत आनंददायी वेळ घालवण्यासाठी येथे विविध मनोरंजन व साहसी उपक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे वॉटर पार्कमध्ये स्विमिंग पूल, रेन डान्स व वॉटर स्लाईड्स, तर अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये झिप लाईन, सायकलिंग, स्काय रोलर, केंट रोलर, स्किडर, ह्युमन गायरो, ३६० सायकल, बंजी जंपिंग व रोप कोर्स यांसारखे रोमांचकारी खेळ पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
तसेच लुडो, चेस, कॅरम, आर्चरी, पूल टेबल, बॉडी झोर्बिंग बॉल यांसारखे इनडोअर गेम्स, किड्स प्ले एरिया, बैलगाडीने फळबागांची सफर आणि महाराष्ट्रीयन चुलीवरील जेवण ही विशेष आकर्षणे असणार आहेत. कुटुंबियांसाठी सेलिब्रेशन हॉल तसेच फॅमिली व जनरल रूममध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश शुल्काबाबत आयोजकांनी सांगितले की, ३ ते ९ वर्षांपर्यंत ५०० रुपये, ९ वर्षांवरील व्यक्तींकरिता ८५० रुपये आणि ६० वर्षांवरील व्यक्तींकरिता ६०० रुपये असे शुल्क ठेवण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक सदस्यांच्या गटाला बुकिंगमध्ये १० टक्के सवलत दिली जाणार आहे.
निसर्गरम्य वातावरणात कुटुंबासोबत आनंददायी सुट्टी घालवण्यासाठी हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. इच्छुकांनी बुकिंगसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

error: Content is protected !!