मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मुल येथील वार्ड क्रमांक १४ येथील रहिवासी गजानन दादाजी शेंडे (वय ४९) हा इसम मच्छी पकडण्यासाठी गेल्यानंतर बुडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, गजानन शेंडे काल सायंकाळपासून घरातून बाहेर पडला होता. त्याची सायकल बसस्थानकाजवळील देशी दारूच्या दुकानासमोर उभी असल्याचे दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार, तो दारूच्या नशेत तलावात मच्छी पकडण्यासाठी उतरला असावा.
आज दुपारी सुमारास ३ वाजता तलावात एक प्रेत तरंगताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती तात्काळ मूल पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून प्रेत बाहेर काढले व ते शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे पाठवले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















