मूल : रवि बरडे (तालुका प्रतिनिधी)
काल दिनांक 21 रोजी मूल सह तालुक्यात वादळी पावसाला साय 5-30 वाजता सुरुवात झाली असून 7 वाजेपर्यंत पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसेच पावसासोबत विजेचा कडकडाट हा नागरिकांना भयभीत करणाराच होता पावसानी तब्बल तासभर दमदार बॅटिंग केली तसेंच वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील बेलघाटा गावात मुख्य रस्त्यावरील मोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली या वादळी पावसाचा फटका धान कापूस मिरची भाजीपाला पिकांना बसला असून पिकाची मोठी हानी झाली आहे. पावसामुळे धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे असाच रोज पाऊस येत राहिला तर आणि खरीप पिकावर फवारणी करण्यास विलंब झाला तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सामना करावा लागेल हे मात्र निश्चित आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















