मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
येथील श्री स्वामी समर्थ भक्तिसेवा समिती, मूल यांच्या वतीने हनुमान मंदिर तलाव पाळ परिसरात श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या जयंती सोहळ्याअंतर्गत गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक व पूजा-अर्चना, दुपारी १२ वाजता गोपाळकाला आणि सायंकाळी ४ वाजता सहभोजन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन येरोजवार, उपाध्यक्ष अशोक आक्केवार तर सचिव विजय बट्टे असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















