Homeताज्या बातम्यामुल बाजार समितीत उघड्यावर ठेवलेल्या धान्याचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाईची मागणी

मुल बाजार समितीत उघड्यावर ठेवलेल्या धान्याचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाईची मागणी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अचानक वादळी पावसामुळे मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली असून, प्रभावित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल येथे जमा केले होते. मात्र सदर धान्य सुरक्षित गोडाऊन किंवा शेडमध्ये न ठेवता खुल्या आवारात ठेवण्यात आल्याने वादळी पावसात धान्य भिजून मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतमालाच्या सुरक्षेची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची असताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत भाजपा महामंत्री प्रशांत बोबाटे यांनी माननीय तहसीलदार, मूल यांना निवेदन देऊन घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी राकेश ठाकरे, युवराज चावरे, वंश बोबाटे, अमोल येलंकीवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाची प्रत माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही देण्यात आली असून प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

error: Content is protected !!