मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील ताडाळा गावात शरद आणि राकेश या व्यक्तींमार्फत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा गावात रंगत आहे. देशी, विदेशी तसेच बिअर अशा विविध प्रकारच्या मद्याची विक्री त्यांच्या घरीच सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जणू त्यांच्या घरातच बिअर बार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या अवैध व्यवसायामुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरात नेहमीच मद्यधुंद व्यक्तींची वर्दळ वाढल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
तसेच या अवैध व्यवसायाला स्थानिक पोलीस पाटलांचे सहकार्य असल्याची चर्चा गावात सुरू असून याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















