Homeताज्या बातम्यानक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

ब्रेकिंग न्यूज
मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणीमेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडीविदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळामूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखलचंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापतीमूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजनफिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळीपोलीस पाटीलच अवैध दारू व्यवसायाला पाठीशी? ताडाळा गावात चर्चांना उधाणभगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच परिवहन महामंडळाची बस या गावांमध्ये पोहोचली आणि गावकऱ्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले.
बस गावात दाखल होताच नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत तिचे जल्लोषात स्वागत केले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते—कारण आता रोजची कठीण पायपीट संपणार, अशी आशा निर्माण झाली आहे.
तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी ही गावे नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम असल्यामुळे अनेक वर्षे येथे पक्के रस्ते नव्हते. परिणामी, वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाचखळग्यांच्या मार्गाने पायपीट करत प्रवास करावा लागत होता. मात्र, गडचिरोली पोलिस दलाने पोलिस अधीक्षक नीलोत्प्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा पुरवून रस्ते बांधकाम पूर्ण केले आणि आज अखेर या भागात बस सेवा सुरू झाली.
अहेरी आगारातून सुटलेली बस तुमरकोठीत पोहोचताच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. तुमरकोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ सुरासे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या बससेवेने आता शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी गावकऱ्यांच्या दारी येणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापती

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे...

error: Content is protected !!